संत
शिरोमणी मन्मथ माऊलिंनी अनेक ओव्या, अभंग, पदे, आरत्या, भारुडे, कटाव, लावणी या
काव्यांची रचना केली आहे. समाजाच्या चालीरीतींना योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी
शेकडो भारुडे रचली, ज्यांना त्यांनी गबाळ किंवा घबाड असे नाव दिले. अध्यात्मिक आणि
नैतिक शिकवण या भारूडांच्या माध्यमातून मन्मथ माऊलिंनी लोकांना दिली. या घबाड/भारुड या प्रकारात जोशी, सौरी, शरणार्थ,
गारुडी, गोंधळ, फुगडी, जागल्या, इत्यादी प्रकारची भारुडे समाविष्ट होतात. पैकी
जोशी या प्रकारचे भारुड तुम्हा सर्वांसाठी येथे देतो आहे.
।।
घबाड ।।
वंदून
सद्गुरूंचे चरण । स्वाभाविक बोले मुळची खुण ।।
शेटे
चौधरी महाजन । पंडित ऐका लक्ष्य देवून ।।१।।
बरे
होय गा नाना । बरे होय गा नाना ।।धृ।।
डुगडुग
चिंता करू नका । वटवट वावगी सोडून ऐका ।।
धन
धन करील त्याशी थुंका । सर्वथा वचन बोलेना फुका ।।२।।
या
गावावरी येई काळे । सदा कुरकुरती कावळे ।।
पांढरी
पाल भविष्य चाळे । तेणे झाले तोंड काळे ।।३।।
भूलेभावे
ममतेचे । कळाहीन हो भक्तिचे ।।
आता
अविद्या रांडीचे । बिऱ्हाड लागले अभागीणीचे ।।४।।.
काम
बया भारी खोडी । भूल घाली घडोघडी ।।
तेणे
झालो देशोधडी । भवसागरी ढकली तातडी ।।५।।
दंभ
अभिमानाचा धोटा । वाऊगाची घुमतो करंटा ।।
वाढवी
विस्मरण चपेटा । भावार्थ धन्यावीन पोरटा ।।६।।
क्रोध-श्वान
घर धुंडाळी । धावून शुचित पात्र विटाळी ।।
भयस्थान
कर्म झळाळी । परिपक्व जैसी लिंबोळी ।।७।।
भरिले
देहबुद्धीचे विकार । न तुटे जन्म-मरण धार ।।
फिराल
लक्ष चौऱ्यांशी फेर । काही बर होईना बर ।।८।।
मग
काळाचा टोणपा केळ्वेल । नांदते घर भंगून मोडेल ।।
एक
एका द्वेष मांडेल । खेळ पुंडाचा माजेल ।।९।।
चोरावा
सुटेल चहूफेर । थोर थोरांची घेतिल घर ।।
अभक्ति
आड केले द्वार । तेव्हा थुंकती सज्ञानी नर ।।१०।।
कामडौर
वायू पुकार । चार हाट चार बाजार ।।
जे
न ऐकती अभक्त नर । ते धाकाने बुडाले सत्वर ।।११।।
तुम्हाला
होरा देईन घबाड । कि जो न पडे कदा ओसाड ।।
पडू
द्या शिवभक्तीचे बिऱ्हाड । आळसू नका स्मरणाचे सुखाआड ।।१२।।
घबाड
होरा दिधला ज्याशी । सुखे दोंद वाढेल त्यासी ।।
काळ
फिरे, लागे पायाशी । होका समाश्रुंग अणायासी ।।१३।।
अष्टप्रकृतीचे
पलीकडे । मग काळाचा दात पडे ।।
शिवपद
हाता चढे । मोक्ष राबे दारापुढे ।।१४।।
दास
मन्मथ निजप्रकार । स्वानंदे करून करतो पुकार ।।
आत्मतत्वी
करितो बाजार । ते ऐकती ज्ञाती नर ।।१५।।
संकलन - अविनाश यशके ( संपर्क - ८१४९७६०१५० )
No comments:
Post a Comment