लिंगायत शरण
मन्मथ माउलींचा अभंग -
"षटस्थल ज्ञान
हाची महायोग ।
भक्ताचा अनुराग
सर्वकाळ ।।
शिवावीन अन्य
दुजा नाही देव ।
भक्तस्थळी भाव
हेची शुद्ध ।।
महेश्वरा ऐसा असे
दुजे स्थळ ।
देखिली सकळ शिवरूपी
।।
लिंगार्पित सर्व
प्रसादची होती ।
हेची दृढ चित्ती
प्रसादिका ।।
लिंग तोची प्राण
प्राण तोची लिंग ।
असे तो अभंग
प्राणलिंग ।।
त्रिकाळ पूजन
ज्ञानलिंगाठायी ।
शरणस्थळी पाही
भक्त तैसा ।।
सहावे स्थळ
ऐक्यभावे श्रेष्ठ ।
शिवरूपी
दृष्टलीरे शेवा ।।
म्हणे मन्मथ बसवभक्तादिका
।
सर्वश्रेष्ठ देखा
षटस्थल ।।"
वरील अभंगातून मन्मथ माउली बाराव्या
शतकातील बसवादी शरणानी सांगितलेला आणि आचरणात आणलेला षटस्थल सिद्धांत मांडत आहेत.
स्वाभिमानी समतावादी लिंगायत विचारधारा ज्या सहा स्थळावर आधारित आहे त्याची
सविस्तर मांडणी सोप्या पद्धतीने करून मन्मथ माउलींनी आपणास करून देण्याचा प्रयत्न
करत आहेत. आज आपणाला खरी गरज ही आहे कि आपण लिंगायत महापुरुषांचे चरित्र त्यांचे
कार्य, त्यांचा संदेश अभ्यासून
आचरणात आणला पाहिजे महापुरुषांचे फोटो फक्त मिरवून चालणार नाही तर त्यांनी दिलेला
संदेश महत्वाचा आहे. आज आपण लिंगायतांचे आचरण लिंगायत विचारधारे नुसार आहे का हे
तपासण्याची वेळ आली आहे. वर्षातून एकदा वारीला जावून महापुरुष कळत नसतात तर
वर्षातील ३६५ दिवस आपले आचरण लिंगायत विचारधारेवर आधारित असले पाहिजे. आजचा
लिंगायत हा फक्त जन्माने लिंगायत आहे, लिंगायत आई वडील म्हणून लिंगायत. लिंगायत धर्मातील पहिले स्थळ 'भक्तस्थळ' आहे. ते विश्लेषित करताना मन्मथ माउली म्हणतात, -
"शिवावीन अन्य
दुजा नाही देव ।
भक्तस्थळी भाव
हेची शुद्ध ।।"
आपले आचरण
पहिल्या स्थळाच्या पात्रतेचे आहे का ? थोडा प्रत्तेकाने विचार केला पाहिजे. सर्व भारतीयांचा मूळपुरुष असलेल्या शिवा
व्यतिरिक्त आपली श्रद्धा असता कामा नये, परंतु आजचा लिंगायत किती देव पाळतो आणि किती ठिकाणी आपला स्वाभिमान गहन ठेवतो ?
आज आपण सर्व लिंगायतानी कमीतकमी भक्तस्थळ
प्रवेश जरी मिळवायचे ठरविले तरी आपण मन्मथ माउलीचे नाव घेण्यास पात्र आहोत असे
मानावे.
साभार - इंजि.
विजयकुमार शेटे
( संस्थापक अध्यक्ष
- लिंगायत सेवा संघ)
उत्तम अवि आप्पा आणि शेटे सर धन्यवाद
ReplyDeleteशेटे सर झणझणीत अंजन घालणारी पोस्ट आहे. .
ReplyDeleteचांगली माहिती दिली सर ...
ReplyDeleteVery nice information sir
ReplyDelete