ANUBHAVA MANTAPA

ANUBHAVA MANTAPA

Sunday, November 29, 2015

मन्मथ माऊलिची षटस्थळ संकल्पना


लिंगायत शरण मन्मथ माउलींचा अभंग -
"षटस्थल ज्ञान हाची महायोग ।
भक्ताचा अनुराग सर्वकाळ ।।
शिवावीन अन्य दुजा नाही देव ।
भक्तस्थळी भाव हेची शुद्ध ।।
महेश्वरा ऐसा असे दुजे स्थळ ।
देखिली सकळ शिवरूपी ।।
लिंगार्पित सर्व प्रसादची होती ।
हेची दृढ चित्ती प्रसादिका ।।
लिंग तोची प्राण प्राण तोची लिंग ।
असे तो अभंग प्राणलिंग ।।
त्रिकाळ पूजन ज्ञानलिंगाठायी ।
शरणस्थळी पाही भक्त तैसा ।।
सहावे स्थळ ऐक्यभावे श्रेष्ठ ।
शिवरूपी दृष्टलीरे शेवा ।।
म्हणे मन्मथ बसवभक्तादिका ।
सर्वश्रेष्ठ देखा षटस्थल ।।"
      वरील अभंगातून मन्मथ माउली बाराव्या शतकातील बसवादी शरणानी सांगितलेला आणि आचरणात आणलेला षटस्थल सिद्धांत मांडत आहेत. स्वाभिमानी समतावादी लिंगायत विचारधारा ज्या सहा स्थळावर आधारित आहे त्याची सविस्तर मांडणी सोप्या पद्धतीने करून मन्मथ माउलींनी आपणास करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपणाला खरी गरज ही आहे कि आपण लिंगायत महापुरुषांचे चरित्र त्यांचे कार्य, त्यांचा संदेश अभ्यासून आचरणात आणला पाहिजे महापुरुषांचे फोटो फक्त मिरवून चालणार नाही तर त्यांनी दिलेला संदेश महत्वाचा आहे. आज आपण लिंगायतांचे आचरण लिंगायत विचारधारे नुसार आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे. वर्षातून एकदा वारीला जावून महापुरुष कळत नसतात तर वर्षातील ३६५ दिवस आपले आचरण लिंगायत विचारधारेवर आधारित असले पाहिजे. आजचा लिंगायत हा फक्त जन्माने लिंगायत आहे, लिंगायत आई वडील म्हणून लिंगायत. लिंगायत धर्मातील पहिले स्थळ 'भक्तस्थळ' आहे. ते विश्लेषित करताना मन्मथ माउली म्हणतात, -
"शिवावीन अन्य दुजा नाही देव ।
भक्तस्थळी भाव हेची शुद्ध ।।"
      आपले आचरण पहिल्या स्थळाच्या पात्रतेचे आहे का ? थोडा प्रत्तेकाने विचार केला पाहिजे. सर्व भारतीयांचा मूळपुरुष असलेल्या शिवा व्यतिरिक्त आपली श्रद्धा असता कामा नये, परंतु आजचा लिंगायत किती देव पाळतो आणि किती ठिकाणी आपला स्वाभिमान गहन ठेवतो ? आज आपण सर्व लिंगायतानी कमीतकमी भक्तस्थळ प्रवेश जरी मिळवायचे ठरविले तरी आपण मन्मथ माउलीचे नाव घेण्यास पात्र आहोत असे मानावे.

साभार - इंजि. विजयकुमार शेटे
( संस्थापक अध्यक्ष - लिंगायत सेवा संघ)

लिंगायत धर्म इतिहासाविषयी माहिती मिळणाऱ्या काही websites व blogs



  • http://lingayatreligion.blogspot.in/
  • www.basavsansthasolapur.com/
  • www.lingayathism.net
  • www.lingayatreligion.com
  • www.lingayatsevasangh.org/
  • http://www.basavadivinecenter.org/home.html
  • http://www.basavanna.org/
  • http://www.statueofbasava.com/
  • http://www.basavamarga.blogspot.in/?m=1
  • https://basavanna.wordpress.com/
  • http://www.freeindia.org/biographies/sages/basaveshwara/page10.htm
  • http://www.lordbasaveshwara.blogspot.in/?m=1
  • http://www.taralabalu.org/
  • http://www.vachana.sanchaya.net/
  • http://www.vachanasahitya.gov.in/
  • Basava samithi Australia- http://www.bsoaa-perth.org/
  • http://www.hiremathasamsthana.org/english/home.php




अभ्यासकांच्या दृष्टीकोनातुन लिंगायत धर्म



लिंगायत धर्म हा नकारात्मक नसून क्रियाशील ,सकारात्मक आहे. त्यांचा एकेश्वरवाद, गुरु, लिंग, जंगमांची कल्पना कायक भावनाच त्यांच्या निदर्शक आहेत.
-          डॉ.हीरेमल्लुर ईश्वरन (समाजशास्त्र )

वीरशैव हा शब्द वचनांच्या काळात म्हणजे बाराव्या शतकामध्ये कर्नाटकच नव्हे तर आंध्रप्रदेशाच्याही कोणत्याही काव्य, शास्त्र, शिलालेखमध्ये आलेला दिसत नाही. तो शब्द शरण चळवळी नंतर अस्तित्वात आला आहे. त्यामुळे लिंगायत हा शब्दच मूळ मानावा लागेल.
-          डॉ.एम.एम.कलबुर्गी (माजी कुलगुरु, कन्नड़ विद्यापीठ, हंपी)

दिन दलितांच्या उद्धारासाठी उदयाला आलेला व सर्व योगांचा सुंदर समन्वय साधलेला लिंगायत धर्म स्वर्ग-मर्त्य , इह-पर, भौतिक-पारमार्थिक, लोकायत-अध्यात्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आला आहे. तो एक जीवनमार्गच नव्हे तर सामाजिक धर्मही आहे.
-          डॉ.दे.जवरेगौड़ा (माजी कुलगुरु, म्हैसूर विश्वविद्यालय, म्हैसूर)

लिंगायत धर्म कर्मठपनाच्या यज्ञ-यागादी संस्कारान्ना मुळीच महत्व न देता, वैचारिकता व् नैतिक परीशुद्धता यांना अधिक महत्व दिल्यामुळे आज विश्वधर्माच्या मालिकेत जाऊन बसला आहे. पुरोहितशाही विरुद्ध दंड थोपटुन उभा राहिलेला हा धर्म असून भक्त व् भगवंत यांच्यामधे पुरोहितांची दलाली नको असे तो घंटाघोष करून सांगतो.”
-          डॉ.ए.एल.शिवरूद्रप्पा (संपादक, प्रसाद मासिक कर्नाटक)

स्त्री शुद्रांना धार्मिक अधिकार नाकारनार्या आणि पशुपति हत्या, यज्ञयाग, जातीभेदाचे समर्थन करनार्या हिंदु धर्माला बसवेश्वरानी नाकारले. त्या बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माची मानवतावाद ही समाजाला फार मोठी देणगी आहे.
-          डॉ.एन.जी.महादेवप्प (कर्नाटक विद्यापीठ, धारवाड़)

बसवेश्वरांसह शिवशरनांनी निर्माण केलेला 'लिंगायत' हा एक परिपूर्ण सिद्धांत आहे. अंग-लिंगमुखी, समान समाजमुखी, समृद्ध समाजमुखी असे हे चतुर्मुखी सिद्धांत आहेत.
-          सिद्धराम स्वामीजी (नागनुर रुद्रक्षी मठ, बेळगाव)

संकलन - सचिन पि.घुसे ( कळमनुरी, जि. हिंगोली )
संपर्क - 9604225322
 

जगद्ज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या विषयी जगातील काही मान्यवरांचे उद्दगार


"महात्मा बसवेश्वर हे मध्ययुगीन भारताचे जनक होत.बसवेश्वरांच्या नेतृत्वाखालील 12 व्या शतकातली लिंगायत चळवळ ही सामाजिक क्रांतीची चळवळ होती.भारताच्या सुधारणा कार्याचा तो पहिला स्फोट होता."
- मानवेंद्र रॉय (प्रख्यात राजकीय विचारवंत)

"महात्मा बसवेश्वर हे जागतिक कीर्तीचे एक श्रेष्ट समाजसुधारक होत.बसवेश्वर म्हणजे असे एक 'सर्वसमन्वयतत्व ' होय की ज्यामध्ये सर्व तत्ववेत्यांचे विचार प्रवाह येउन मिळतात."
- डॉ.सिद्धय्या पुराणिक (जेष्ट कन्नड़ साहित्यिक)

"महात्मा बसवेश्वर हे भारताचे पाहिले स्वतंत्र विचारवादी व् लोककल्याणकारक प्रतिभावंत होते. जुन्या बुरसटलेल्या रुढी विरुद्ध हातात बंडाचा झेंडा घेणारे पहिले समाजसुधारक होत."

- ऑर्थर माइल्स (पाश्च्यात विचारवंत)

"आधुनिक  समाज सुधारक महात्मा बसवेश्वरांची भाषा बोलत आहेत आणि त्यांचेच विचार कृतित आणण्याचे प्रयत्न करीत आहेत."
- सर जेम्स कैम्बेल (पाश्च्यात विचारवंत)...

"भारतात समाज-सुधारणेचे आंदोलन सुरु करणाऱ्या संता मध्ये महात्मा बसवेश्वर यांचे स्थान फार वरचे आहे. त्यांचा आग्रह होता, कि समाजात स्त्री आणि पुरुषाचे स्थान समान असले पाहिजे. एवढेच नाही तर, त्यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. लोकभाषा कन्नड मध्ये त्यांनी निर्माण केलेले साहित्य आजही आम्हास प्रेरणादायी आहे."
- यशवंतरावजी चव्हाण (माजी उप प्रधानमंत्री)

"जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही बसवन्नाच्या फ़क्त एका वचन/विचार आत्मसात करा. तुम्ही जीवनातल्या रंगांसोबत बाहेर पडाल आणि तुम्हाला कळेल पृथ्वीवर जन्म घेण्याचं महत्त्व."
- ए.पि.जे.अब्दुल कलाम (माजी राष्ट्रपती)


संकलन - सचिन पि.घुसे ( कळमनुरी, जि.हिंगोली ) 
संपर्क - 9604225322