ANUBHAVA MANTAPA
Sunday, November 29, 2015
महात्मा बसवन्नांची निवडक वचने - मराठी
Sunday, July 26, 2015
वचनवाङमय
बाराव्या शतकात धर्मशास्त्र कठीण अशा संस्कृत भाषेत बंदिस्त होणे,संस्कृत ही देवनागरी लिपी शिकणे सर्व सामान्यांचा अधिकार नव्हता. संस्कृत भाषेत ज्ञानाची संपदा बंदिस्त झाल्याने फार मोठा समाज ज्ञानापासून वंचित होता. अशा प्रसंगी म. बसवण्णांनी सर्वसामान्यांना समजेल- उमजेल अशा बोली भाषेतून अर्थात कन्नड भाषेतून धर्मसूत्रे अतिशय सोपी आणि सुलभ करून वचनाच्या माध्यमातून सांगितली. बसवण्णांनी बचनाआधारे लोकांना धर्मशास्त्राचा फक्त परिचय करून दिला असे नाही तर भाषे- भाषेतील अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संस्कृत हीच फक्त देवभाषा आणि इतर भाषा द्रविडभाषा किंवा दानवभाषा हा भेद नष्ट केला. वचनावाङमयातून जनसामान्य लोकांची जागृती उध्दार आणि मार्गदर्शन हाच मुख्य उद्देश असल्याचें दिसून येते. अनाकलनीय अशा सौंदर्यप्रचुर -पांडित्यपूर्ण शब्दांचा वापर न करता किंवा राजे- महाराजे, धनवान गणमान्य व्यक्तींची अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारे स्वार्थी काव्यरचना त्यांनी केली नाही. तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आत्म्याची जाणीव करून देणे त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात आपले जीवन सार्थकी बनविण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयाण म्हणजे वचनवाङमय होय.
या वचनाचं स्वरून ती अनुप्रास किंवा वृत्ताच्या नियमांनी घट्ट बांधली गेली नाहीत किंवा गद्या प्रमाणेत अति सैल होऊन वाहत गेली नाहीत. तर यात पद्याची लय, नाद आणि गद्याची सरलता आहे. म्हणून ही एकप्रकारची गद्दगीते आहेत. बसवण्णांची वचने याचे एक उत्कृष्ठ उदा. बनले आहे. मुळात बसवण्णा हेच खरे वचन रचनाकार आणि मूळ निर्माते आहेत. ही वचनेहृदयातील भावनेच्या सुगंधाने ओथंबलेली आणि अतिसहज कोणत्याही भाषेतून सुगम गायन बनली आहेत. यात पांडित्यप्रचूर शब्दांचा गोंधळ नाही. दार्शनिक हृदय इथे कवीहृदय बनले आहे. कवी हृदयाने फक्त शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नवरसपान करणारे काव्य बनविले आहे. तर दार्शनिक हृदयाने त्याच्याही पुढे एक पाऊल टाकत अर्थ- शब्द सौंदर्याच्या रसास्वादाला दैवी भावनेचे सिंचन प्राप्त झाले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या वचनात लय-अनुप्रास आपोआपच निर्माण झाला आहे. ही वचनसंपदा केवळ एक साहित्यकृतीच नाही तर ती तात्वीक बनली आहेत.
वचन साहित्याचा उगम का? आणि सिा झाला? हे पहिले मोठे उध्बोधक आहे आशिया खंडात सर्वप्रथम सामाजिक, धार्मिक आणि साहित्यीक क्रांती घडून आली ती १२ व्या शतकात कर्नाटकामध्ये. ही बाब भारताच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नमुद करण्यासारखी आहे. तेव्हाची परिस्थिती पाहता बौध्द धर्माला भारताबाहेर घालविण्यात आणि जैन धर्माला शिथिल करण्यात वैदिक धर्म आणि त्यातील कर्मकांड यशस्वी ठरली. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था पुन्हा भक्कम झाली. अनेक देवोपासना आणि पुरांहितशाहीने आपली पाळेमुळे पुन्हा एकदा समाजात घट्ट रूजवली. अज्ञान, अंधश्रध्दा यांच्या जोडीने दारिद्रय आणि रोगराई गुण्यागोविंदाने नांदू लागली. धर्म, ज्ञान, भाषा (संस्कृती) ही एकाच वर्गाची मक्तेदारी झाली चया सर्वांचा धिक्कार करीत १२ व्या शतकात म.बसवण्णांनी क्रांती घडविली. या क्रांतीचे प्रभावी अस्त्र किंवा हत्यार म्हणजे वचनसाहित्य/ वचनवाङमय होय. या वचनसाहित्याच्या तलवारीला धार दिली ती अनुभवमंटपाच्या ज्ञानपीठातील अनुभवाने. ही क्रांतीची तलवार कन्नड भाषेच्या म्यानात विराजमान झाली. म.बसवण्णाच्या या ‘ वचनरूपी’ परिस्पर्शाने अनेक शरणांच्या विचरांची ज्ञानज्योत प्रज्वलीत केली. अनेक शरणांनी कंठ फुटला. त्या वचन रचनाकार बनल्या. खरच ‘ न भूतो न भविष्यति.’ भारताच्या काना- कोप-यातून आलेल्या शरणांच्या वचनज्योतीने अनुभवमंटप उजळून निघाला संबंण मानवजातीच्या मनात आत्मसाक्षात्काराचा हुंकार घडविणा-या वचनसाहित्याने भारतभुमी उजळून निघाली. मानवजातीच्या कल्याणाच्या दिशेने धर्माची पावले वळू लागली. म. बसवण्णाचे स्थान अनेक कारणांनी अनन्यसाधारण ठरले आहे.त्यांनी स्थापन केलेल्या अनुभवमंटपरूपी ज्ञानर्पणात सर्व जाती, वर्ग,वर्ण, लिंग असा भेदभाव न करता शरण-शरणी एकत्र आल्याचा उल्लेख आयदक्की लक्कम्माच्या वचनातून स्पष्ट होतो. ‘यांच्या शरणांचे सातशे सत्तर अमरगणांचा प्रसाद घेऊनी जगते आहे’ या वचनातून हे सर्व शरण-शरणी एकत्र बसून आपल्या आत्मज्ञानाबारोबरच अनुभावावर चर्चा करीत. अनुभवमंटपात होणारी ही चर्चा अथवा अभिप्राय शांतरस ( शरण) आणि त्यांच्या हाताखालील कर्णिक ( कारकून) लिहून घेत. त्यावन शून्य पीठाधिकारी अल्लमप्रभूदेव वचनातील त्रूटीदूर करून त्यावर मान्यतेचा मोहोर उमटवीत.त्या वचनाच्या अनेक प्रती तयार करून चरजंगमाला देण्यात येत असे. हे चरजंगम एका गावात एक दिवस व शहरात पाच दिवस मुक्काम करून ती वचने सुगम गायनातून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत. वचन साहित्यांतून प्रबोधनाची जनजागरणाची एक मोठी चळवळ त्याकाळात उभी राहिली होती. ती सामाजिक, धार्मिक, आर्थिक पुनरूज्जीवनाची मोठी क्रांतीच होती. ही वचने ताडपत्रांवर लिपीकार मुद्रित करून ठेवत. हा त्या काळातला एक नवा आविष्कार होता. कारण त्याकाळी शिलालेख, ताम्रपट, मातीच्या विटा यावर अक्षरे कोरली जात पण ताडपत्रावर इतक्या मोठ्या प्रमाणात रचना कोरण्याची प्रक्रिया खरच कौतुकास्पद अशीच होती. याचे सारे श्रेय म.बसवण्णा आणि शरण-शरणींना जाते.
- प्रा. डॉ. प्रभा वाडकर ( लिंगायत सेवा संघ कोअर कमेटी मेम्बर )
साभार - दैनिक एकमत
Saturday, June 13, 2015
लिंगायतांची अष्टावरण संकल्पना
१) गुरु - अरिवे गुरु म्हणजेच ज्ञान हाच गुरु ही सोप्पी गुरुची व्याख्या बसवन्ना नि आपल्याला सांगितलीये .
२) लिंग - लिंगायतान्नी ईश्वर नाकारलाही नाही आणि इतरांनी तो ज्या प्रकारे स्वीकारला त्या पद्धतीने स्विकारलाही नाही . लिंग अर्थात ईष्टलिंग , ईष्टलिंग म्हणजे आपणा स्वतःला अभिप्रेत असणारा देव , आणि तो सदैव आपल्या सोबत असल्याची जाणिव राहावी यासाठी त्याला आकार देवून महामानव बसवन्ना नि तो आपल्या तळहातावर दिला .
३) जंगम - जन+गम , लोकांमधे जाऊन धर्माचा प्रसार प्रचार करणारा कोणीही व्यक्ति म्हणजे जंगम . काळओघाने आज जाती निर्माण झाल्यात त्यात जंगम ही पण एक जात झालिये पण धर्म ज्या सिद्धान्तावर उभा राहिला तोच प्रचारक म्हणुनच जंगम शब्दाचा उल्लेख योग्य आहे .
४) रुद्राक्ष - आठ बाह्य आवरनांन पैकी एक , आणि आपण शिवाचे वंशज आहोत याची साक्ष देणारे एक महत्त्वपूर्ण आवरण म्हणजे रुद्राक्ष .
५) भस्म - CaCO3, कैल्शियम कार्बोनेट , जे अंगाला लावताच एनर्जी निर्माण करते , आणि आपणाला निर्णायक बनवते , हा झाला वैज्ञानिक मुद्दा पण शरण बांधवांना एकमेकांची ओळख व्हावी त्यांत आपसी संबंध वाढावेत हा त्या मागचा उद्देश . आणि हे तीन पट्टे अनुक्रमे भुत, भविष्य आणि वर्तमानाची साक्ष ठेवून सत्याने व निष्ठेने काम करण्याची प्रतिके आहेत ....
६) पादोदक - स्वतःच्या ज्ञानाने सुर्यावत तेजस्वी होने म्हणजे पादोदक , म्हणजे ज्ञानामृताचे प्राशन म्हणजे पादोदक पण आपले दुर्दैव की याचा खरा अर्थ सांगण्याचे काम ज्यांचे होते त्यांनीच त्यांचे पाय धुवून पाणी पाजन्याचा प्रकार सुरु करून धर्माशी प्रतारणा केलि .
७) प्रसाद - कोणालाही न लुबाडता न फसविता , कायक करून कमावलेल्या पैशातुन केलेला उदरनिर्वाह म्हणजेच प्रसाद .
८) मंत्र - " ॐ नमः शिवाय " जगातील पहिल्या संस्कृतीचा जनक आणि आपल्या सर्वांचा पूर्वज शिव यांचे स्मरण आपल्याला सदैव राहावे करीता हा मंत्र अष्टावरणात समाविष्ट करण्यात आला .
मी मला समजल त्या प्रमाणे अष्टावरण संकल्पना प्रामाणिक पणे येथे मांडलिय , अनेक वचनातुन मला जेवढा अर्थबोध झालाय तेवढा मी संक्षिप्तरुपात व्यक्त केलाय . तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही पण शेयर कराल हीच एक अपेक्षा ठेवतो .
शरनु शरणार्थी .....!
- अविनाश यशके (8149760150)
लिंगायतांचि षटस्थळ संकल्पना
लिंगायत धर्मात सहा स्थळे आहे (six stages) ज्याला आपण षटस्थळ म्हणतोत. ह्या six stages आपण प्रत्येकाने achive करण्याचा प्रयत्न करायचा असतो, म्हणजे जेणेकरून एक परिपूर्ण लिंगायत बनता येईल.! ही षटस्थळे achive करण्यासाठी अष्टावरण आहेत ज्यांचा उपयोग ज्ञान संपादन करने आणि मनावर ताबा मिळवन्यास होतो.! आणि पाच आचार आहेत ज्यांना आपण पंचाचार म्हणतोत जे क़ी धर्माचरणात येणारे अडथळे दूर करण्यासाठी उपयोगी पडतात.!
आता ही सहा स्थळे कोणती ते पाहुत :-
१) भक्त :-
आता भक्तस्थळ हे पहिल स्थळ, नेमके भक्त कुणाला म्हणावे हा पहिला प्रश्न आणि याच उत्तर मिळवण्यासाठी मी संदर्भ घेतो संत शिरोमणि मन्मथ माऊली यांचा, मन्मथ माऊली षटस्थळाच विवेचन करणाऱ्या आपल्या एका अभंगात म्हणतात,-
"शिवाविन अन्य दूजा नाही देव ।
भक्तस्थळी भाव हेची शुद्ध ।।"
शिव हा एकमात्र देव मानून त्याची भक्ति करणारा म्हणजे भक्त. लिंगायत बनन्याची पहिली पायरी म्हणजे हे भक्तस्थळ.
२) माहेश्वर :-
चराचरी सर्वत्र शिव, प्रत्येक मानसात शिवाचा अंश शोधणारा शिवभक्त म्हणजे माहेश्वर. ह्या स्थळात पोहोचल्यावर भक्त हा चिकित्सक वृत्तिचा होतो. धर्माविषयी उत्सुकतेने अभ्यास करणारा हा माहेश्वर.
३) प्रसादी :-
या स्थळात थोड़ी वैश्विक भावना माहेश्वरात जागृत होते, चिकित्सका बरोबरच जिज्ञासा प्रकट होते, लिंगार्पित सर्व प्रसाद म्हणून हा सेवन करतो. हा प्रासादिक गुण पहिली दोन स्थळे प्राप्त केल्यानंतर आपसुकच जागृत होतो. मनावर आणि वाचेवर ताबा येतो. हे तीसर स्थळ, लिंगायत बनण्याची तीसरी पायरी.
४) प्राणलिंगी :-
स्वतःमधे शिवाला शोधनारा म्हणजे प्राणलिंगी. जो इतरांच्या उपयोगी जावे यासाठी धड़पड़त असतो तो, थोडक्यात म्हणजे समाजाविषयी तळमळ असणारा व्यक्ति म्हणजे हा चौथ्या स्थळातिल प्राणलिंगी.
"लिंग तोची प्राण, प्राण तोचि लिंग ।
असे तो अभंग प्राणलिंग ।।"
५) शरण :-
"जो विसरतो तो माणूस , आणि जो जाणतो तो शरण" या सोप्प्या शब्दांत शरणांची व्याख्या केल्या गेली आहे. जानिवांचा शिरोमणि म्हणजे शरण. समाजाविषयी कळकळ असणारा म्हणजे शरण, समाजासमोर काही विघ्न आल्यास जिद्दीने पेटुन उठनारा पण शरण. शरण स्थळाबद्दल लिहिताना या लेखात येथेच विराम देतो. कारण शरण म्हणजे अतिशय संवेदनशील बनलेल्या व्यक्तीची पायरी आहे. धर्मासाठी आपले तन मन धन अर्पण करणारा शरण याचाच गौरव आपल्या अभिवादनात केल्या जातो.
६) ऐक्य :-
बसवन्ना म्हणतात लिंगायतांसाठी मरण हिच महानवमी आहे. लिंगायत धर्मातील सर्वांत महत्वाचे आणि सर्वोच्च स्थल म्हणून ऐक्यस्थळ ओळखले जाते , जिव आणि शिव एक होण्याची stage म्हणजे ऐक्यस्थळ .
- अविनाश यशके (8149760150)
Tuesday, June 2, 2015
कविता - बसवण्णा सर्वांसाठी
माझी ही छोटीशी कविता बसवण्णाला अर्पण
"बसवण्णा सर्वांसाठी"
दलितांच्या उत्थानासाठी,
स्त्रियांच्या कल्याणासाठी,
वचनांची निर्मिति केलि,
सर्वजनांच्या मानासाठी ।
रावहि आले रंकहि आले,
प्रत्येकाने कायक केले,
मार्ग दावीला तू बसवेशा,
जगताच्या कल्याणासाठी ।
अनुभव मंटप स्थापन केला,
समतेचा सन्मार्ग दाविला,
येथे अबला बनल्या सबला,
धर्माच्या सन्मानासाठी ।
आम्हासी शिवधर्म दाविला,
आप्तांचा स्वधर्म दाविला,
धर्म दाविला तू बसवेशा,
बहुजनांच्या कल्याणासाठी ।
कवी - अविनाश यशके (8149760150)
महात्मा बसवण्णाजी का लिंगायत धर्म आचरण संदेश
१) मनुष्य और मनुष्य के बीच जाती, वर्ण, वर्ग, आश्रम, कुल, गोत्र, उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य आदि के भेद-भाव नष्ट कर सारे संसार में मानव समता स्थापित होनी चाहिए ! यह मानव समता ही विश्व-बंधुत्व, विश्वप्रेम और विश्वशांति का आधार हैं !
२) जीवन के प्रत्येक क्षेत्र में स्त्री-पुरुषों को सामान अधिकार होने चाहिए !
३) प्रत्येक व्यक्ति 'स्वकायक ' द्वारा अपना और अपने परिवार का उदरपोषण करे !
४) सभी कायक समान सम्मान दृष्टि से देखे जाएँ !
५) परान्नसेवी शोषणवृत्ति और भिक्षाव्रत्ति का जनजीवन से पुर्णतः निष्कासन हो !
६) जाती-सूतक, जनन-सूतक, प्रेत-सूतक, रज-सूतक और उछिष्ठ-सूतक न मने जाएँ !
७) बहुदेवोपासना, भुतप्रेतों की पूजा और धार्मिक अंधविश्वास एवं पाखंड का पुर्णतः निर्मूलन किया जाएँ !
८) अविचार, अनाचार, दुर्भावना तथा तामसिक वृत्तियों को त्याग मानवसमाज सदाचार, सत्कर्म और सदधर्म का आचरण करे !
९) जनजीवन में मांसाहार, मद्यपान, जुआ खेलनेकी आदत, फसवेगिरी, विश्वासघात, क्रूरता पूर्ण कुकर्म, छल, कपट, इर्ष्या, द्वेष, वेश्यावृत्ति, हिंसाचार, एवम् अनीतिपूर्ण व्यवहार समाप्त हो !
१०) प्रत्तेक व्यक्ति अष्टमद, षडरिपु और इंद्रियजन्य विकारों से अलिप्त रहे !
११) भौतिक सुखों के पीछे भागने की अपेक्षा दासोह और लोकसेवा के लिए अपने जीवन का सदुपयोग करे !
१२) शोषण करना, शोषित होना अथवा शोषण करने में प्रत्यक्ष्य अथवा परोक्ष रूप से सहयोग देना - तीनों समान रूप से अपराध हैं !
१३) देहदेवालय में, हृदय के सिंहासन पर इष्टलिंग की प्रतिष्ठा करना सदभक्ति हैं !
१४) बसव-तत्व, लिंगायत-धर्म, शिव-आचार, शरण-संस्कृति, एवम् वचन-साहित्यानुरूप आचरण तथा इष्टलिंग, अष्ठावरण, पंचाचार एंव षड्स्थल आचरण के अनुभाव से हर कोयी शरण पद और लिंगांग-सामरस्य प्राप्त कर सकते हैं !
१५) प्रत्तेक व्यक्ति को सामाजिक, धार्मिक, आर्थिक एंव लोककल्याण के क्षेत्र में स्वतंत्र-चिंतन और स्वतंत्र - अभिव्यक्ति का अधिकार होना चाहिए !
१६) वैराग्य के नाम पर समाज से परागंमुख हो गिरी खंडरों में तपश्चर्या करना 'पलायन' हैं | गृहस्थ-जीवन जीते हुए शिवाचार का पालन करना पुरुषार्थ हैं, लिंगायत धर्म हैं !
१७) तर्क, प्रमाण, और अनुभाव द्वारा मुक्त-चिंतन से प्रत्येक व्यक्ति को स्वकल्याण का राजमार्ग प्राप्त हो सकता हैं !
१८) स्वकल्याण के बिना लोककल्याण नहीं हो सकता, अतः व्यक्तित्व के वैश्विक विकास के बिना, वैश्विक समानता संभव नहीं !
यही स्वाभिमानी लिंगायत धर्म संहिता हैं.!
साभार - लिंगायत सेवा संघ.