ANUBHAVA MANTAPA

ANUBHAVA MANTAPA
Showing posts with label अनुभव मंटप. Show all posts
Showing posts with label अनुभव मंटप. Show all posts

Monday, December 8, 2014

जगातला उत्कृष्ट संघटक माझा अप्प बसवन्ना

जगातला उत्कृष्ट संघटक माझा अप्प बसवन्ना

मित्रांनो शरणु शरणार्थी ,
      आज संघटन म्हणजे काय हे आपल्याला वेगळ सांगन्याची गरज ऊरली नाही. कुणी एक नेता असतो मागे चार-पाच कार्यकर्ते असतात , आणि राष्ट्रिय कार्यकारिणी त्यांच्यात वाटुन दिलेली असते . ( अपवाद असतात भरपूर पण उल्लेख जागे अभावी करणार नाही ) . पण आज पासून जवळपास 900 वर्षांपूर्वी माझ्या अप्प बसवन्नाने एक असे संघटन करून दाखवले ज्याची न भूतो न भविष्यति अशीच गणना केलि जाईल. थोडक्यात बांधनी मांडतोय , -

१) अनुभव मंटप - लिंगायत धर्मासाठी कायदे बनवनारी संघटना , बसवन्ना याचे संस्थापक अध्यक्ष .

२) शून्य पीठाधीश (अनुभव मंटप अध्यक्ष )- अप्प बसवन्नाच्या संघटनेच एक वैशिष्ट्य. अप्प बसवन्नानी धर्मप्रमुखाच काम ज्ञ्यानाच्या तत्वावर ठेवले . बसवन्नाच्या अनुभव मंटपाला अनुक्रमे अल्लमप्रभुदेव , सिद्धरामन्ना , चन्नबसवन्ना आणि रूद्रमुनी या चार व्यक्तींनी नेतृत्व दिलेल आहे. ह्यांच्या परवानगी नेच लिंगायत धर्माचे कायदे बनले आहेत.

३) शरण (अनुभव मंटप सदस्य) - जर अनुभव मंटपाला आजचे लोकशाही दालन म्हटले तर शरण म्हणजे लोकप्रतिनिधि , शरनांनी वचन रुपात कायदे पारित करण्यासाठी मांडले आणि अनुभव मंटपाद्वारे चर्चेतून ते पारित केल्या गेले. शरण पदापर्यंत पोहोचण्यासाठी अंगी धर्माविषयी तळमळ , चिकित्सक अभ्यासू वृत्ति आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कायक आवश्यक होता . जवळपास 350 जातींचे आणि 10% स्त्रियांचा सहभाग (आरक्षण लागु नसताना पण ) असलेले 770 शरण अनुभव मंटपाला लाभले होते .

४) जंगम (धर्मप्रचारक ) - अनुभव मंटपाद्वारे तय्यार केल्या गेलेल्या कायदेरूपी वचनांचा प्रचार , प्रसार आणि अंमलबजावनी करुण घेण्याच सर्वात मोठ दायित्व उचलनारे पूर्णवेळ कार्यकर्ते . अनुभव मंटपाला लाभलेल्या एकूण प्रचारकांची संख्या 196000 असल्याचे साहित्यात आढळते.

५) लिंगायत ( बसवन्नाच्या संघटनेचा पाईक ) - तुम्ही मी आपण सर्व आज बसवन्नाच्या, अनुभव मंटपाच्या घालून दिलेल्या नियमांवर चालत आलेल्या खुप मोठ्या संघटनेचे वारसदार आहोत .

      आज भाषेच्या कारणामुले आणि परकीय मनुवाद्यांमुले संघटनेत पुष्कळ बदल घडले असतील पण स्वतःचा ईतिहास वाचून आपण खरे लिंगायत बनू शकतोत . शेवटी लिंगायत हा आचरण धर्म आहे . जंगम, शरण, अनुभव मंटप आणि बसवन्नाच्या तत्वावर चालणार्याच सर्वोत्कृष्ट संघटन आहे. असा माझा अप्प बसवन्ना आणि त्याच्या धर्मातील आज अस्तित्वात असलेल्या प्रत्येक संघटनेने एकत्रित येवून समाजासाठी , अस्तित्वासाठी एकत्र येवून बसवन्नासारख्या संघटकाचे वारसदार असल्याचे जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे . म्हणून माझ्या तमाम लिंगायत बांधवांनो आपला जाज्वल्य ईतिहास डोळ्यासमोर ठेवून लिंगायत या एका नावाखाली संघटित व्हा ! मला माहिती नाही की आज धर्ममान्यता परत मिळवन्यासाठी सर्व जन , सर्व संघटन एकत्र कसे होतिल पण एक लिंगायत या नात्याने सर्वसामान्य लिंगायताची पण हीच भावना आहे आणि हेच स्वप्न आहे एवढे मी सांगू शकतो . माझ्या 6 कोटि लिंगायतांच्या भावनांचा विचार करुण सर्व संघटनांनी एकत्र येण्याची योजना आखावी . संघटनेच्या नावाखातर नव्हे तर समाजाच्या अस्तित्वाखातर लढाव एवढीच रास्त अपेक्षा .

- अविनाश यशके
( संपर्क क्र.-8149760150 )

( ह्या विचारांना फेसबुक वर मत , प्रतिक्रिया देण्यासाठी visit करा -
https://m.facebook.com/photo.php?fbid=737217073038580&id=100002508833029&set=gm.752091684869863&refid=18&_ft_&__tn__=E )