क्रांतिगीत
जातीयवादाच्या आणि वैदिक संस्कृतीत गुरफटलेल्या माझ्या बांधवांसाठी ही चळवळीत सामिल होण्यासाठी माझी आर्त हाक !
जूंपलेस आम्हाला अंधश्रद्धांच्या जोखडात ,
ओढलेस फटकार पाठीवरी आमुच्या ,
तरी राहिलो गप्प अगणित वर्षांपासून ,
तरी राहिलो निद्र अगणित वर्षांपासून ।
पण आज उठू दे आम्हाला ,
रणशिंग फुंकू दे आम्हाला ,
आप्त स्वकियांची ताक़त ,
अरे आज कलु दे आम्हाला ।
का बांधतोस तू आप्तांन्ना ,
त्या संघ वगैरे खोडाला ,
का चेतवितोस तू भ्याडासारखा,
जाती दंगली , त्वेशांना ।
अरे शोध तुझा ईतिहास खरा ,
बाप खरा अन तुझा धर्म खरा ।
अरे सामिल हो चल आम्हाला ,
या नव्या युगाच्या नाऱ्याला ।
- अविनाश दिलिपआप्पा यशके, पूर्णा
(८१४९७६०१५०)
No comments:
Post a Comment