ANUBHAVA MANTAPA

ANUBHAVA MANTAPA

Friday, January 3, 2014

वचन बसवन्नाचे

आग्रह धरावा शरणांनी ,
की परधनासी न लावीन हात !
आग्रह धरावा शरणांनी ,
की न धरिन परस्त्री हव्यास !
आग्रह धरावा शरणांनी ,
की अनेक देवतांचा न धरिन ध्यास !
आग्रह धरावा शरणांनी ,
की लिंग-जंगम हे एकचि रुप !
आग्रह धरावा शरणांनी  ,
की न श्रेष्ठ काही प्रसादावीन !
अशा सत्याच्या आग्रहाविन ,
कुडलसंगम न होई प्रसन्न !

"नाही भित मी डसन्यासाठी येनारया सापाला !
नाही भित मी भडकलेल्या अग्निच्या ज्वालेला !
नाही भित मी तलवारीच्या धारेला !
एकाच गोष्टीला घाबरतो मी ,
परस्त्रीला , परधनाला हात लावण्याला !"
- क्रांतिवीर महात्मा बसवन्ना

1 comment: